T20 World Cup :IPL फायनल झाले, आता T20 वर्ल्ड कप सुरु होणार, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी सुरू होतील?

T20 World Cup :IPL फायनल झाले, आता T20 वर्ल्ड कप सुरु होणार, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी सुरू होतील?

आयपीएल 2024 नंतर टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडू अमेरिकेत पोहोचले आहेत.

आयपीएल 2024 संपले. रविवारी, २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने विजयाची पताका फडकवत ट्रॉफी जिंकली.

आता आयपीएल संपल्यानंतर टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाचे जवळपास सर्व खेळाडू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. अमेरिकेला पोहोचण्यासाठी फक्त २-३ खेळाडू उरले आहेत. T20 World Cup

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र वेळेतील फरकामुळे भारतातील ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होणार आहे.

👇👇👇👇

टीम इंडियाचे T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक  जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेच्या अ गटात आहे, ज्यामध्ये भारताव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजचे सर्व सामने अमेरिकेतच खेळणार आहे.

हे ही वाचा..👇👇👇

रेल्वे ग्रुप C मध्ये होणार मेगा भरती! दहावी पास करू शकतात अर्ज; जाहिरात प्रसिद्ध!

टीम इंडिया बुधवार, ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 30 एप्रिल रोजी T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती.

रोहित शर्माला संघाचा कर्णधार आणि हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 15 सदस्यीय संघाशिवाय 4 राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली. Read more 

Leave a Comment