Beed Loksabha result 2024 – बीडमध्ये 18 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे आघडीवरती, एवढ्या मतांनी आघाडी!   जाणुन घ्या…

Beed Loksabha result 2024 – बीडमध्ये 18 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे आघडीवरती, एवढ्या मतांनी आघाडी!   जाणुन घ्या…

लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. सुरूवातीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे पाचव्या फेरीला ८९४१ मतांनी आघाडीवर होते. परंतू सहाव्या आणि सातव्या फेरीत भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांचे मताधिक्य कापत बरोबरी गाठण्याकडे वाटचाल केली. सातव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे हे २०३ मतांनी आघाडीवर होते.

बजरंग सोनवणे यांना पहिल्या फेरीत ५३७४, दुसऱ्या फेरीत २३१९, तिसऱ्या फेरीत २१९७, चौथ्या फेरीत ८९५६, पाचव्या फेरीत ८९४१, सहाव्या फेरीत १३८७ तर सातव्या फेरीअखेर २०३ मतांची आघाडी मिळाली. सातव्या फेरीअखेर भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे यांना १ लाख ६५ हजार ०६ मते मिळाली.

हे ही वाचा..

एक्झिट पोलनंतर, गुंतवणूकदार आणि व्यापारी या 20 समभागांमध्ये बेट लावून इंट्राडेमध्ये मजबूत कमाई करू शकतात.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना १ लाख ६५ हजार २०९ मते मिळाली. तर आठव्या फेरीला पंकजा मुंडे यांनी झेप घेत ९ हजार ३६६ मतांची आघाडी घेतली. या फेरीअखेर पंकजा मुंडे यांना एकूण १ लाख ९३ हजार ९२२ तर बजरंग सोनवणे यांना १ लाख ८४ हजार ५५६ मते मिळाली.

बीड लोकसभा निवडणुक 2024

बीड लोकसभा

फेरी क्रमांक -17

पंकजा मुंडे- 413213

बजरंग सोनवणे-401869

आघाडी – 11344 (पंकजा मुंडे)

 

बीड लोकसभा 

फेरी क्रमांक -18

पंकजा मुंडे-444455

बजरंग सोनवणे-420356

आघाडी -24099 (पंकजा मुंडे)..Read more 

 

Leave a Comment