Ladki bahin yojna 2024; मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज 

Ladki bahin yojna 2024; मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ही कागदपत्रे नसतील तरीही करता येणार ऑनलाइन अर्ज, असा करा अर्ज

नमस्कार, सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी नियमितपणे विविध प्रकारच्या योजनेची माहिती या पोर्टल वरती घेऊन येत आहोत.

यामध्ये शासकीय, निम-शासकीय, शेतकरी शैक्षणिक राजकीय, उद्योजक, यासह अनेक महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यासाठी एकाच पोर्टल वरती देण्याचं काम करत आहोत.

आता आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना जारी केली आहे तरी यासाठी महिलांनी त्यासाठी लागणारे कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हे गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यातील काही कागदपत्रे नसतील तरी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे अशी घोषणा केली आहे.Ladki bahin yojna 2024

तर ही कागदपत्रे कोणती तसेच कोणत्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख किती आहे व अंतिम तारीख काय आहे,

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी शुल्क काय आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल नक्कीच जर मित्रांना शेअर करा..

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-

१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.

तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल,

तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे

प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. ६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड

उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.Read more 

👇👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा..

 

 

Leave a Comment