CM Ladki Bahin Yojna: ऑफलाइन पद्धतीने घरच्या घरी भरा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म, असा करा ऑफलाइन फॉर्म डाउनलोड…

CM Ladki Bahin Yojna: ऑफलाइन पद्धतीने घरच्या घरी भरा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म, असा करा ऑफलाइन फॉर्म डाउनलोड…

नमस्कार सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवनवीन विषयावरती अनेक ताजा घडामोडी शासकीय बातम्या तसेच सरकारी नोकरी राजकीय शैक्षणिक चालू घडामोडी यासह आपल्या नजदीकच्या सर्व बातम्या एकाच पोर्टल वरती प्रसारित करण्याचे काम करतो.

मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र सरकारचे जे शेवटचे वेतन होते या आर्थिक वेतनामध्ये त्यांनी महिलांकरता मुख्यमंत्री लाडकी  बहीण योजना ही योजना महिलांसाठी लागू करण्याची घोषणा केलेली आहे.

तरी याकरता आपण ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासाठी पात्रता काय कागदपत्रे कोणती या सदर्भाची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये देणार आहोत.

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला मागील लेखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती दिली आहे आपल्याला तो लेख वाचण्यासाठी आम्ही खाली लिंक त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.

त्या लिंक वरती क्लिक करून आपण मागील आर्टिकल वाचू शकता तर मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने घरच्या घरी कसा भरायचा यासंदर्भा सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देणार आहोत.

हे पण वाचा..👇👇👇

लाडकी बहीण योजना अंतर्गत कुटुंबातील किती महिलांना घेता येणार योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती…

जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपले जवळील ज्या लाडकी बहिणी आहेत अशा बहिणींना शेअर करा जेणेकरून ते देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात व दरमहा दीड हजार रुपये मिळू शकतात.

तर मित्रांनो या लाडके बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला राज्य सरकारने काही नियम व अटी दिलेले आहेत या अटीचे पालन करूनच आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

लडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने कसा भरायचा जाणून घ्या..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, तीच पद्धत वापरायची आहे. या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती भरावी लागेल.

याशिवाय, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय, महिलांना वैवाहिक स्थितीच माहिती देणेही अर्जात बंधनकारक आहे.

याशिवाय, या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल.

यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे महत्त्वाचे आहे. त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल.

सगळ्या शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते, हे स्पष्ट करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खुण करावी.Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment