Ration Card News: मोफत राशन मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! E-kyc करण्याची तारीख वाढली? या तारखेपर्यंत करून घ्या आपली केवायसी..
शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंत्योदय योजनेतून एक मोठा वर्ग मोफत रेशनचा लाभ घेत आहे.
फसवणूक टाळण्यासाठी रेशन कार्ड ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. हे महत्त्वाचे काम तुम्ही आजपर्यंत पूर्ण केले नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
इ -केवायसी करण्याची तारीख वाढली..
अन्न आणि पुरवठा विभागाने रेशन कार्ड युनिट्ससाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी आजपर्यंत हे काम पूर्ण केले नाही त्यांना याचा फायदा झाला आहे.
या तारखेपर्यंत करू शकाल आपली ई -केवायसी..
यापूर्वी eKYC करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली होती. ज्याला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीही दोनदा मुदत वाढवण्यात आली आहे.Ration Card News
3 वेळा वाढवण्यात आली इ केवायसी करण्याची तारीख..
यापूर्वी eKYC करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आली होती, ती 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता ती फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे.
न केल्यास बंद होतील राशन कार्ड..
मुदत वाढवल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना पुरेसा वेळ मिळतो.
अशा परिस्थितीत ई-केवायसी अगोदरच करून घ्या. तसे न केल्यास मोफत तांदूळ आणि गहू बंद होईल.
इ-केवायसी करायचे मुख्य कारण..
केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याने केवळ पात्र असलेल्यांनाच फायदा होईल. जर बनावट शिधापत्रिका एखाद्याच्या नावावर असेल तर ते रद्द केले जाऊ शकते.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया काय आहे
केवायसी प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन करता येते. याशिवाय रेशन डीलरकडे जाऊनही तुम्ही हे काम करून घेऊ शकता.Read more