Ahemadabad plane crash:-अहमदाबाद ते लंडन जाणारे एअर इंडियाचे विमान क्रॅश; विमानात भारतीय १६९,ब्रिटनचे ५३, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा १ प्रवासी होते, संपूर्ण प्रवासी यादी पहा..
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाला अपघात झाला. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने देशभरात खळबळ उडाली.
हे विमान विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या एका मिनिटात या विमानाचा अपघात झाला आहे, विमानाच्या पायलटणे आपत्कालीन मेसेज देखील पाठवलेला होता.
विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. हा अपघात अहमदाबादच्या मेघनानगर भागात घडला, जिथे विमान विमान कोसळले ते ठिकाण वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहावरती कोसळला आहे या ठिकाणी विमान कोसळल्याा नतर संपूर्ण परिसरामध्ये आगेचा भडका उडाला होता..Ahemadabad plane crash
👇👇👇👇
नातेवाईकाची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट कोठे व कशी होणार सविस्तर माहिती जाणून घ्या..
गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा विमान अपघात झाला.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानगर भागात हा अपघात झाला,
जिथे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.
घटनास्थळावरून निघणारा धूर आणि जळत्या विमानाचे फोटो या अपघाताची भीषणता सांगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (VT-ANB) विमान होते,
जे दुपारी १:३८ वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी २३ वरून उड्डाण करत होते.
उड्डाणानंतर लगेचच विमानाने एटीसीला ‘मेडे’चा कॉल दिला, परंतु त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान हवेत तोल गेला आणि काही सेकंदातच ते विमानतळाच्या हद्दीबाहेर दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले.
अपघातानंतर लगेचच आग लागली, जी विझवण्यासाठी ७ हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
एअर इंडियाचे निवेदन समोर आले आहे. त्यात म्हटले आहे की विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.Read more