Pune Bridge Collapse: पुणे मधील इंद्रायणी नदीवरील पूल कस काय तुटला ?सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे किंवा इतर काही कारण; जाणून घ्या यामागील मुख्य कारण….

Pune Bridge Collapse: पुणे मधील इंद्रायणी नदीवरील पूल कस काय तुटला ?सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे किंवा इतर काही कारण; जाणून घ्या यामागील मुख्य कारण….

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील इंद्रायणी नदी या इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला आहे आणि हा पूल कोसळल्यामुळे या ठिकाणी पर्यटन म्हणून आलेले नागरिक या पुलाच्या अपघातामध्ये नदीमध्ये वाहून गेले यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार चार जणांचा मृत्यू झालेला आहे.

तसेच 36 जणांना वाचवण्यात यश आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा देखील या ठिकाणी केलेली आहे तर आपण आज जाणून घेणार आहोत की,

पुणे शहरातील इंद्रायणी नदीवरील असणारा लोखंडी पूल कोसळण्या मागचे मुख्य कारण काय आहे.या ठिकाणी सुरक्षा अभावी किंवा इतर काही कारणां स्तव हा अपघात झालेला आहे का याची आपण या ठिकाणी सकल माहिती घेणार आहोत…

हे पण वाचा…👇👇👇

अहमदाबाद विमान दुर्घटनेचे कारण आले समोर; थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

रविवारी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास पुण्याजवळील इंद्रायणी नदीवर बांधलेला एक छोटासा लोखंडी पूल अचानक तुटल्याने हा अपघात झाला.

अपघातावेळी पुलावरून येणारे-जाणारे सुमारे ५० लोक जोरदार प्रवाहाने वाहणाऱ्या नदीत पडले. काही लोक कोसळलेल्या पुलाखाली गाडले गेले.

सहा जणांची प्रकृती गंभीर आहे..

पूल कोसळल्यानंतर नदीत पडलेल्या लोकांपैकी ३८ जणांना स्थानिक लोकांनी आणि एनडीआरएफच्या पथकाने नदीतून बाहेर काढले आहे.

            👉Join whatsaap..👈

काही लोक स्वतःहून नदीतून पोहत बाहेर पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूल तुटण्याचे कारण खाली दिलेले आहे..

रविवार असल्याने आजूबाजूच्या परिसरातील अनेक पर्यटक नदीकाठावर जमले होते. वेगाने वाहणारी इंद्रायणी नदी पाहण्यासाठी पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक पुलावर उभे होते. अचानक पूल मधूनच तुटला आणि पुलावर उभे असलेले लोक नदीत पडले.

खडकाळ नदीमुळे, त्यात तरंगणारे अनेक लोक दगडांना धडकून जखमी झाले. जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या म्हणण्यानुसार,

क्रेनच्या मदतीने तुटलेला पूल उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण अजूनही काही लोक तुटलेल्या पुलाखाली गाडले जाण्याची शक्यता आहे.Read more 

Leave a Comment