State Employee Retirement Age | राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६०,ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख ! बाबत महत्त्वाची अपडेट..

State Employee Retirement  Age : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासोबत सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६०,
ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पे मर्यादा रद्द करण्यात यावी ही कर्मचाऱ्यांची मागणीही मान्य करण्याचे आश्वासन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघ व कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निवृत्त

तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे 👉क्लिक करा👈

सचिव सुबोध कुमार समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल २० नोव्हेंबरपर्यंत शासनाला सादर होईल, असे आश्वासन यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले.

केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्यात यावी यासाठीही महासंघाने वारंवार पाठपुरावा केला होता.

ग्रेड पेची ही मर्यादाही रद्द करण्याचे आश्वासन यावेळी मुख्य सचिवांनी दिले. केंद्र सरकार व इतर २५ राज्यांप्रमाणे सेवा निवृत्तीचे वय ६० करावे, ८० वर्षांच्यावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव पेन्शन देण्याबाबत शासनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

ग्रुच्युईटीची सध्याची १४ लाख रुपयांची कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर २० लाख रुपये करण्याच्या मागणीबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन यावेळी मुख्य सचिवांनी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, विनोद देसाई, नितीन काळे, समीर भाटकर, विश्वास काटकर, भाऊसाहेब पठाण यांना दिले.

सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी येथे 👉
क्लिक करा👈

 

 

Leave a Comment