Satbara Utara : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! सातबारा उतारा मध्ये 50 वर्षानंतर मोठा बदल करण्यात आला आहे..

Satbara Utara : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! सातबारा उतारा मध्ये 50 वर्षानंतर मोठा बदल करण्यात आला आहे..

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत विविध आदेश जारी केले जातात. येथे जमीन, वारसा आणि इतर हक्कांची खरेदी-विक्री, पाण्याच्या नाल्या यांच्या नोंदी ठेवल्या जातात,

परंतु आता यामध्ये पन्नास वर्षानंतर मोठा बदल करण्यात आलेला आहे तर हा बदल काय करण्यात आला या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत..

सातबारा उतारा मंदिर आपल्या जमिनीचा पूर्ण नकाशा असतो म्हणजे ज्याला जमिनीचा आरसा म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.

याचे कारण म्हणजे आपण आपल्या शेतात किंवा इतर ठिकाण न जाता घरबसल्या आपल्या जमिनीच्या उताराद्वारे आपली जमिनीची हद्द कुठपर्यंत आहे

व जमिनीमध्ये कोठे बांध विहीर आहे याची नोंद घरबसल्या बघू शकतो याला आपण सातबारा म्हणू शकतो. 

हे पण पहा..👇👇👇

फार्मर कार्ड असेल तरच मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता..

राज्य सरकारच्यामहसूल विभागाने तब्बल ५० वर्षानंतर सातबाऱ्यात महत्वाचे बदल केले आहे. सातबारा उताऱ्यात स्पष्टता आणि अचुकता निर्माण होण्यासाठी हे महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

महसूल विभागाकडून करण्यात आलेले ११ महत्वाचे बदल.

१) गाव नमुना 7 मध्ये गावाचा नावासोबत कोड क्रमांक.

२) लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार.

३) शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ तर बिनशेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ नवीन मापन पद्धत वापरणार.

४) यापूर्वी “इतर हक्क” मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार.

५) मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार.

६) फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी ‘प्रलंबित फेरफार’ स्वतंत्र रकाना असणार.

हे पण पहा..👇👇👇

घराच्या छतावर बसवा मोफत सोलार!असा करा ऑनलाईन अर्ज

७) सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार.

८) दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार.

९) गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार.

👇👇👇👇

सातबारा – आठ मोबाईल द्वारे काढण्यासाठी येथे क्लिक करा..

१०) बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हेच एकक, जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेत.

११) बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार.

Leave a Comment