ladaki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! आधारलिंक बॅंक खाते ज्यांचे त्याच खात्यात जमा होणार 3000 रूपये;

ladaki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख १५ हजारांवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पाच लाख ९० हजार महिलांच्या बॅंक खात्यात राखीपौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. पण, ज्या महिलांचे बॅंक खाते आधारलिंक आहे, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. अनेकांनी त्यांच्याकडील राष्ट्रीयीकृत बॅंकेचा क्रमांक दिला आहे. पण, त्यातील बरीच खाती आधारलिंक नाहीत. त्यामुळे त्या महिलांनी दोन दिवसात बॅंक खात्याला आधारलिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे आता प्रत्येक महिलांना आपले खाते आधारलिंक आहे की नाही, याची खात्री करावी लागणार आहे. सध्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यांचे अर्ज तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शासनाला पाठविले जात आहेत. सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्यात राखीपौर्णिमेची ओवाळणी म्हणून तीन हजार रुपये वितरित होतील. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यातही रक्कम वर्ग केली जाणार आहे.

‘नारीशक्ती दूत’ ॲप बंद; अर्जासाठी आता स्वतंत्र पोर्टलमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरवातीला ‘नारीशक्ती दूत’वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर सव्वादोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. आता ते ॲप बंद करण्यात आले असून अर्ज करायला https://ladakibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ladaki bahin yojana

बॅंक खात्याला आधारलिंक करणे जरूरीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी
सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख १५ हजार महिलांनी आतापर्यंत अर्ज केले
असून त्यापैकी पाच लाख ९० हजार महिलांचे अर्ज अंतिम करून यादी शासनाला पाठविली आहे.
ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
पण, ज्यांचे बॅंक खाते आधारलिंक नाहीत त्यांना बॅंकेत जाऊन खाते आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.

Leave a Comment