खुशखबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिला संदर्भात,अतिशय महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित !

Employee Medical Bill Governance Circular :सन २०२३ २४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की, दि. २६ / १० / २०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.

सर्व प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून
👉घेण्यासाठी येथे क्लिक करा👈

तथापि शासन पत्र क्र. वेतन- १२२३/प्र.क्र.१०२ / टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीन देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.

सन २०२३ २४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झालंनंतर २२०२०४४२. २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

तथापि सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग,

आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याचा सांधावी

शासन परिपत्रक खाली पहा

Leave a Comment